हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील सरकारी दवाखाना चौकात टमाटर घेऊन जाणारा ट्रक पलटी:सुदैवाने जीवितहानी नाही
हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील सरकारी दवाखाना चौकात हैदराबाद कडून नागपूरकडे टमाटर घेऊन जाणार ट्रक क्रमांक ए.पि.३९ यु. डी ६२९९ हा सुमारास अनियंत्रित होऊन पटली झाला यावेळी ट्रक चालकाने ट्रक मधून उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.