हिंगणघाट: उमरखेड बाजार समितीच्या संचालक मंडळाची हिंगणघाट शहरातील बाजार समितीला भेट; जाणून घेतली सोयीसुविधाची माहिती
हिंगणघाट शहरातील विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वैविध्यपुर्ण योजना राबविणाऱ्या सुप्रसिद्ध असलेल्या बाजार समितीला उमरखेड बाजार समितीचौ संचालक मंडळाने भेट देऊन येथे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधाची पाहणी केली. बाजार समितीचे सभापती *अँड सुधिरबाबु कोठारी यांचे हस्ते उमरखेड बाजार समितीचे सभापती कृष्णाजी देवसरकर तसेच संचालक गजाननजी सोळंके, राजेशजी कवाने, विश्वासजी कांबळे, भीमरावजी चंद्रवंशी, विवेकजी कन्नावार सहाय्यक सचिव सुधीरजी शिंदे,आदी उपस्थित होते.