हिंगणघाट: चानकी येथे चार कामगार यशोदा नदीच्या पुरात अडकले, सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नागरिक व रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न सुरू
हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला पुर आल्यामुळे परिसरातील नाले ओढे भरून वाहत आहे.यामध्येच जूणी चाणकी येथे चार कामगार अडकले आहे ,रेस्क्यू टीम काही वेळात पोहोचत आहे परंतु परिसरातील नद्यांना पूर असल्यामुळे रेस्क्यू टीम पोहोचायला वेळ लागत आहे.अडकलेल्या कामगारांना वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. बबलू विश्वकर्मा, दिनेश यादव, उमाशंकर वरखेडे आणि शिवकुमार उईके हे बांधकाम मजूर यशोदा नदी पात्राजवळ (चाणकी जुने गावठाण जवळ) अडकलेले आहेत. टिम त्या ठिकाणी पोहचवली आहे