हिंगणघाट: यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे अल्लिपुर-अलमंडोह मार्ग बंद, अलमंडोह गावात शिरले पाणी, तर अनेक गावांचा संपर्क तुटला
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर परीसरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अलमंडोह येथील यशोदा नदीला पूर आला आहे.या पुरामुळे पुलाच्यावर पाणी गेल्यामुळे अल्लिपुर अलमंडोह मार्ग पुर्णता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.तर पुरामुळे शेकडो एकर जमिनीवरील शेतपिक पाण्याखाली गेले आहे. यशोदा नदी पाण्याने नदी तुडुंब भरली असून अलमडोह येथील ग्रामपंचायत कार्यालय व शाळा पर्यत पाणी गेले आहेत शेतकरी बांधवांचे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.