भोकरदन: मंगळी चतुर्थी निमित्त छ.शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते तालुक्यातून हजारो भाविक पायी राजूरच्या दिशेने रवाना
आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 6:30वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुख्य महामार्गाने भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे मंगळी चतुर्थी निमित्त रवाना झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिलाभाई भक्तांची उपस्थिती पाहायला मिळाली असून उद्या 12 ऑगस्ट रोजी राजूर येथे मंगळी चतुर्थी निमित्त मोठा उत्सव साजरा होणार असून गणरायाच्या दर्शनासाठी हे भाविक रवाना झाले आहे.