धुळे: धुळ्यात शनी मंदिर परिसरासह ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा
Dhule, Dhule | Aug 27, 2024 धुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव पाहण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी करत या उत्साहात सहभाग घेतला. मंगळवारी सायंकाळी सात वाजेपासून गोविंदा पथकांनी हंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळाले. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी धुळे शहरात ठिकठिकाणी शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. या दहीहंडी उत्सवात मुलींची गोविंदा पथकंही सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले.