धुळे: मालवण येथील घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
Dhule, Dhule | Aug 27, 2024 धुळे कोकणातील मालवण येथे काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता.या स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच छत्रपतींचा पुतळा कोसळला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शन करण्यात आले.२७ ऑगस्ट मंगळवार दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने घटनेचा निषेध करत.