धुळे: शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी लोणखेडीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकावर तालुका पोलिसांत गुन्हा
Dhule, Dhule | Aug 27, 2024 शासनाकडून प्राप्त निधीचा अपहार करून शासनाची १५ लाख ८६ हजार ६९९ रूपयांत फसवणूक केल्याप्रकरणी लोणखेडीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.गणेश हिरालाल पाटील रा.लोणखेडी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तत्कालीन सरपंच वंदना पाटील व तत्कालीन ग्रामसेवक सचिन शिंदे यांचे विरोधात गुरु दाखल करण्यात आला आहे.