धुळे: गोंदूर तलाव शंभर टक्के भरला; सरपंचांनी साडी चोळीचा आहेर चढवून केली विधिवत पूजा
Dhule, Dhule | Aug 27, 2024 धुळे तालुक्यातील गोंदूर येथील तलाव शंभर टक्के भरल्यामुळे गाव परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. या निमित्ताने गोंदूर ग्रामपंचायत सरपंच अनिता कैलास पाटील यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर चढवून पूजा विधी पार पाडण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या सावलीत असलेल्या गोंदूर गावासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु, यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे तलाव धरणासारखा भरला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.