भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन रोहित शर्माचा सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव' ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार प्रदान...
.
.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रोहितला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
भारतीय क्रिकेटमधील त्याचे उत्कृष्ट योगदान, जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक म्हणून त्याची कामगिरी आणि जागतिक स्तरावर त्याने केलेले टीम इंडियाचे उत्कृष्ट नेतृत्व यामुळे त्याला हा सन्मान जाहीर झाला आहे. अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या आणि मैदानावर आपल्या नेतृत्वाने करोडो चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या रोहित शर्माच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
.
.
.
#RohitSharma | #PadmaShri | #PresidentDroupadiMurmu | #RashtrapatiBhavan | #TeamIndia | #Hitman | #IndianCricket | #CricketNews | #पद्मश्री | #रोहितशर्मा | #मराठीबातम्या
Haveli, Pune | Jun 24, 2026