उद्यान एक्स्प्रेसमध्ये उघडपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री ; कारवाईची मागणी...
.
.
मुंबईवरून सुटणाऱ्या उद्यान एक्सप्रेसमध्ये (Udyan Express) पुणे स्टेशनवरून एक विक्रेता विमल विकण्यासाठी ट्रेनमध्ये चढला आणि उघडपणे विक्री करू लागला. आयएएस (IAS) तुकाराम मुढे साहेबांसारखे अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र विमल आणि गुटखामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असताना, दुसरीकडे रेल्वेमध्येच अशा प्रतिबंधित पदार्थांची अवैध विक्री केली जात आहे.
बाहेरून येऊन रेल्वेमध्ये अशी बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांना स्थानिक स्तरावर कोणाचा पाठिंबा मिळत आहे का? रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत? सामान्य प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि रेल्वेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या अशा घटकांवर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे.
संबंधित रेल्वे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जरा गांभीर्याने लक्ष द्यावे!
.
.
.
#UdyanExpress | #CentralRailway | #PuneStation | #RailwaySecurity | #RPF | #MaharashtraNews | #RailwayPolice | #IllegalSale | #जागरूकनागरिक | #मराठीबातम्या
Haveli, Pune | Jun 24, 2026