बांधकामादरम्यान कात्रज पुलावरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू...
कात्रज पुलावरून पडल्यानं कामगाराचा मृत्यू पुणे कात्रज चौकातील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान उंचावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुरक्षित्तेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली गेली नसल्याचे समोर आले आहे. मुकेश कुमार (वय २८, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत कामगारचे नाव आहे. हा कामगार उड्डाणपुलाच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते पुलावरील उंच भागात काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर...
.
.
.
#Pune #PuneNews #Katraj #KatrajChowk #LaborSafety #WorkersSafety #BhartiVidyapeethPolice #PMC #PuneMunicipalCorporation
Haveli, Pune | Jun 16, 2026