विलास घुले हत्या प्रकरण तापले! आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह केज पोलिस ठाण्यात ठिय्या...
.
.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. विलास घुले यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आता हे प्रकरण कमालीचे तापले आहे. हत्येतील आरोपींना जोपर्यंत पोलीस तात्काळ अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट विलास घुले यांचा मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केज पोलीस ठाणे परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेमकी काय आहे ही घटना? आणि नातेवाईकांची मागणी काय आहे? जाणून घ्या सविस्तर अपडेट्स.
.
.
.
#Kaj #BeedCrime #VilasGhuleMurder #BeedNews #PoliceThiyya #CrimeNewsMarathi #BreakingNews #MaharashtraNews
Haveli, Pune | Jun 23, 2026