👮♂️📚 विद्यार्थी सुरक्षा जनजागृतीसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार!
आज ठाणे येथील आझाद इंग्लिश हायस्कूल, वागळे इस्टेट येथे विद्यार्थी सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात पार पडले. इयत्ता ८ वी ते १० वी मधील सुमारे १४० विद्यार्थ्यांनी या सत्रात सक्रिय सहभाग घेतला.
वागळे पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक श्री. राजेश कदम व पोलीस हवालदार श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि कायदेविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. कविता पाटील तसेच CAWSE Foundation चे कु. भाग्यश्री मनोरे आणि श्री. सौमित मैती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🤝 सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित समाज!
#ThanePolice #StudentSafety #CyberSafety #CyberAwareness #SchoolAwareness #WagleEstate #SafeStudents #CommunityPolicing #Thane #SafetyFirst
24 views | Thane, Maharashtra | Aug 5, 2026