मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर चिरव्हा शिवारात मौदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 6, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मौदा हद्दीत येत असलेल्या चिरव्हा शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली .त्यावरून पोलिसांनी रेती व टिप्पर जप्त केला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मौदा पोलीस करीत आहेत.