जळगाव लाईव्ह न्यूज । नगरदेवळा येथील पिंपळगाव शिवारात उमेश सीताराम महाले यांच्या शेतात तब्बल ११ फुटांचा अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शेतात अजगर दिसताच परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचत मोठ्या शिताफीने या अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यामुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
#jalgaon #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Sep 16, 2026