हिंगणघाट: शहरातील आगारातून तिर्थ यात्रा पॅकेज टूर योजनेअंतर्गत २ बस मधून ८० प्रवासी देवदर्शनासाठी रवाना
हिंगणघाट आगाराकडून आगाराच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रवाशांसाठी विविध योजना राबविण्यात येत अस तिर्थ यात्रा पॅकेज टूर योजनेच्या माध्यमातून २ बस मध्ये ८० प्रवासी देवदर्शनासाठी रवाना झाले आहे.यावेळी आगारातील अधिकाऱ्यांनी बसची पुजा करून प्रवाशांना शुभेच्छा देऊन रवाना केले असून हा टुर हिंगणघाट वरून ,तुळजापूर ,अक्कलकोट ,पंढरपूर ,ज्योतिबा,गणपतीपुढे,जेजुरी,शिर्डी ,शेगाव,परत हिंगणघाट असे देवदर्शन करिता आहे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे ,जयंत सडमाके या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.