हिंगणघाट: शाळा तिथे विद्यार्थी पास" उपक्रमांतर्गत शहरातील आगाराच्या वतीने शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पास देऊन राबविला उपक्रम
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात विद्यार्थ्यांना थेट शाळेत बस पास वाटप हिंगणघाट आगार, वर्धा विभागातर्फे शाळा तिथे विद्यार्थी पास" अभियानाअंतर्गत हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना बस पास वाटप करण्यात आले.या उपक्रमात अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत एकूण १३२४ पासेस तर शैक्षणिक, तांत्रिक व अतांत्रिक गटातील एकूण १९० विद्यार्थी पासेस वितरित करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी थेट शाळेतच पास मिळाल्याने आनंद व्यक्त केला.