हिंगणघाट: अवैद्यरित्या वाळू चोरी विरूध्दात पोलिसांची अलमडोह फाट्याजवळ कारवाई: २५लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट तालुक्याती अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या पथकाने अलमडोह फाट्याजवळ नाकेबंदी करून अवैध वाळू चोरी करणाऱ्या टिप्पर विरोधात कारवाई करीत २५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार अलिपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला खाजगी पेट्रोलिंग दरम्यान मौजा सिरसगांवाकडुन अल्लीपुरकडे एक टिप्पर अवैध वाळू चोरून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने अलमडोह फाट्याजवळ नाकेबंदी करून टिप्पर क्रमांक MH 29 BE 8604 ला अडवून पाहणी केली असा त्यात वाळू आढळून आली