हिंगणघाट: कलोडे सभागृहा सामोरील झोपडपट्टीमुळे अनेक समस्या: उपयोजना करण्याची नागरीकांची न.प.कडे मागणी
हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्डातील कलोडे सभागृहा सामोर असलेल्या झोपडपट्टीमुळे स्थानिक परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे .यासंबंधी स्थानिक नागरीकांना नगर परिषदेला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे याठिकाणी वातावरण भयग्रस्त झाले असून नागरिक दहशतीच्या वातावरणात आहे. पंधरा दिवसात समस्या मार्गी लागण्याची मागणी केली आहे नाहीतर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा येथील रहिवासी क्षेत्रातील नागरिकांनी दिला आहे.