हिंगणघाट: काचंनगाव पवणी अल्लीपूर पांदन रस्ता मुसळधार पावसामुळे गेला वाहून: मार्गावर पुलाची शेतकऱ्यांची मागणी
कांचनगाव पवणी अल्लीपूर पांदन रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी आता रस्ताच राहला नाही.तातडीने या मार्गावर पुल उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी गावातील शिष्टमंडळींनी या मार्गाचा रस्ता व पुल तयार करण्याकरता याबाबत प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली होती. .मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.