हिंगणघाट: अवैध एचटीबीटी बियाणे, किटकनाशक व रासायनिक खत विक्रीसंदर्भात कृषी असोसिएशनचे आमदार समिर कुणावार यांना निवेदन
हिंगणघाट अवैध एचटीबीटी बियाणे,किटकनाशक व रासायनिक खत विक्री विरोधात ३० जुनला कृषी केंद्र संचलांकडून पुकारलेल्या बंद संदर्भात २८ जुन रोजी १२ वाजता आमदार हिंगणघाट कृषी असोसिएशनच्या वतीने आमदार समिरभाऊ कुणावार यांना निवेदन देण्यात आले असून शेतकरी व कृषी केंद्र चालकांचे हित लक्षात घेऊन अवैध एचटीबीटी बियाणे,किटकनाशक व रासायनिक खत विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.यावेळी राजुबाबु राठी, कमलजी मानधानिया,प्रदिपजी कोठारी आदीसह कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.