हिंगणघाट: निमसडा येथे शेतीच्या वादातून काकू आणि चुलत भावाची निर्घृण हत्या, आरोपी पुतण्याने विष प्राशन करून स्वतःला संपवले
निमसडा गावात शेतीच्या वादातून पुतण्याने कु-हाडीने काकू व चुलत भावावर करीत दोघांची निर्घृण हत्या करून स्वताला विष प्राशन करून संपविल्याची धक्कादायक घटना २८ जुन रोजी उघडी आली आहे.पुतण्याने नाव मृत्यक महिंद्रा मोहिजे (वय 56)तर काकू नाव साधना मोहिजे (55 वर्ष) व चुलत भावाचे नाव नितीन मोहिजे (27 वर्ष)असे आहे. काकू साधना मोहिजे यांचा घटनास्थळीच तर चुलत भाऊ नितीन याचा सामान्य रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू तर आरोपी महेंद्र याचाही सावंगी रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला.