परतूर: वाटुर गावासह संपूर्ण तालुक्यात शेत शिवारात उरला फक्त सुखलेला चारा
Partur, Jalna | Oct 10, 2026 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर गावासह संपूर्ण तालुक्यात व इतर भागांमध्ये शेतशिवारात फक्त सुकलेला चारा पाहायला मिळत आहे, याचे कारण म्हणजे पावसाळ्यात या परिसरासह इतर भागात पाऊसच झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मका व ऊस हे पूर्णतः सुकून गेले आहे, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तालुक्यासह संपूर्ण परिसरात गंभीर झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.