रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका दुकानात चोरीची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार, परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून, सदर दुकानातील कामगाराने फसवणूक करून चोरी केलेला लॅपटॉप, सिलिंग फॅन, स्पीकर आदी एकूण ₹2,13,000/- किमतीचा मुद्देमाल आरोपीसह हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice