श्रीगोंद्यात दुर्दैवी घटना! वादळी पावसात वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू....
.
.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. तालुक्यातील आढळगाव आणि घोडेगाव परिसरात काल (२२ जून) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.
या पावसात घोडेगाव येथील रहिवासी असलेल्या अभिषेक रुपचंद दरेकर (वय २१ वर्षे) या तरुणाच्या अंगावर अचानक वीज पडली. हा आघात इतका भीषण होता की, अभिषेकचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण घोडेगाव आणि आढळगाव परिसरावर शोककळा पसरली असून, एका तरुण मुलाच्या जाण्याने दरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पावसाळ्यात विजा चमकत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर अपडेट्स....
.
.
.
#Shrigonda #AhmednagarNews #LightningStrike #Ghodegaon #Adhalgaon #BreakingNews #RainUpdate #MaharashtraWeather
Haveli, Pune | Jun 23, 2026