कर्मचाऱ्याला दिलेली ₹२८ लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन तो पसार झाल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार तपास सुरू असताना आरोपीने साथीदारांसह कट रचून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा माग काढण्यासाठी खडक पोलिसांच्या पथकाने तब्बल २५ दिवसांत १० हजार किमीहून अधिक प्रवास करत उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी तपास केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट, ₹७ लाख रोख रक्कम, सोन्याची अंगठी व चांदीची चैन असा एकूण ₹२६,३३,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
#PunePoliceUpdates