Public App Logo
Profile Picture

पुणे शहर पोलीस

@punecitypolice
186Followers
0Following
Not just a uniform. Not just a duty. It’s a commitment to protect, serve, and stand strong. 🇮🇳

Every frame tells a story of courage, discipline, and honour.

🎬 Crafted by Photobiito – Tanmay Kshirsagar & Team

Police cinematic reel, Maharashtra Police, police uniform, khaki pride, police officer reel, police department video, cinematic videography, cinematic filmmaking, police attitude reel, police photography, Marathi cinematic reel, Maharashtra police department, visual storytelling, professional cinematography, police event coverage, powerful entry reel, cinematic shots, Photobiito, Tanmay Kshirsagar, Photobiito team

<nis:link nis:type=tag nis:id=policecinematic nis:value=PoliceCinematic nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=visualstorytelling nis:value=VisualStorytelling nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=photobiito nis:value=Photobiito nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policepride nis:value=PolicePride nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cinematicfilm nis:value=cinematicfilm nis:enabled=true nis:link/>
पुणे शहर पोलिसांच्या वतीने आयोजित ‘गणेशोत्सव कृतज्ञता सोहळा – २०२६’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी गणेशोत्सव २०२६ निर्विघ्नपणे, उत्साहात आणि सुरळीत पार पाडल्याबद्दल पुणे शहर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

पुणे शहर पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मा. श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १ मा. श्री. कृषिकेश रावले यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी पोलिस दलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, त्यांचे समर्पण आणि गणेश मंडळांना दिलेले सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपत, समन्वय आणि सहकार्याच्या भावनेतून हा उत्सव यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻
प्रसंग कोणताही असो, जबरदस्ती कधीच स्वीकारार्ह नाही. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बिनधास्त ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीत भाविकांचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तपासात या टोळीचा सहभाग निष्पन्न झाला.

या कारवाईत १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, चोरीस गेलेला मोबाईल फोन, धारदार चाकू व लोखंडी कटर असा एकूण ₹२१,२१,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे चैन चोरी व मंगळसूत्र चोरीचे दाखल गुन्ह्यासह एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
Dreams may be imaginary. Traffic violations aren’t. 

Follow traffic rules. Ride safe.

<nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=PunePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=RoadSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficawareness nis:value=TrafficAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficrules nis:value=TrafficRules nis:enabled=true nis:link/>
पाठलाग ‘फक्त एकदा’ झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सावध राहा, मदत घ्या. ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यात आला. 

सदर आरोपी हा मॉडेल कॉलनी परिसरातील हरिओम मठाजवळील सुपर मार्केटजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
हुजूरपागा शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररीत्या कोयता बाळगून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा गुन्हे शाखा युनिट १ ने शोध घेतला.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टिळक रोड परिसरातून आरोपीस ताब्यात घेतले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
असुरक्षित वाटण्याचं कारण शोधत बसू नका. तुमची सुरक्षितता सर्वात जास्त महत्त्वाची आहे. म्हणूनच मदतीसाठी ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना, तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर, येरवडा परिसरातून १९ वर्षीय आरोपीस २४ तासात ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने घराच्या टेरेसवरून ४ मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

सदर कारवाईत ७०,००० रुपये किंमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
नानापेठ परिसरात भाचीला नांदायला पाठवत नसल्याच्या गैरसमजातून झालेल्या वादात फिर्यादीच्या डाव्या हातावर विटेच्या तुकड्याने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
कोणाची चुकीची नजर तुम्हाला अस्वस्थ करत आहे? 
त्याकडे दुर्लक्ष करू नका. असुरक्षित वाटल्यास ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला आरोपी धनकवडी येथील तीन हत्ती चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपींनी संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने गोपनीय माहितीच्या आधारे कोथरूड येथील कर्वे रोड परिसरातून सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील सन २०१५ मधील चोरीच्या गुन्ह्यातील १२ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
एकदा ओलांडलेली मर्यादा दुर्लक्षित न करता त्याच्याविरुद्ध आवाज उठवा. गप्प राहू नका. ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
कोणी तुमची छेड काढत असेल तर त्यामुळे तुम्ही शरमेने मान खाली घालू नका. तुमच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवा आणि त्वरित ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
A 2.2 kg gold heist, a 12-hour manhunt, and Khadak Police on the case.

From reviewing area CCTV footage to tracking suspects hiding within the very same building, the trail led to a swift resolution, with over 100% of the stolen gold recovered by Pune City Police Zone 1.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=swiftactionexcellentpolicing nis:value=SwiftActionExcellentPolicing nis:enabled=true nis:link/>
नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचे कुलूप उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
दोन सोनसाखळी चोरांना अटक!

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवासादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

या गुन्ह्याचा युनिट ७ कडून सखोल तपास सुरू असताना, दोन आरोपींना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडून ₹२,१७,१४० /- किंमतीची, १५.५१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
कोणताही वाईट स्पर्श हा ‘फक्त एकदा’ झाला, म्हणून दुर्लक्षित करू नका. आवाज उठवा, मदत घ्या. ११२ डायल करा.

<nis:link nis:type=tag nis:id=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:value=रंग_निर्भय_नवरात्रीचे nis:enabled=true nis:link/>
Not all distress calls come with a ringtone.

Reach out, speak up, or simply start a conversation. We’re here to listen, support and help.

<nis:link nis:type=tag nis:id=weareheretohelp nis:value=WeAreHereToHelp nis:enabled=true nis:link/>
A ₹75,000 theft, a city-wide trail, and Hadapsar Police on the case. 

From digital clues to ground-level investigation, the trail led straight to Amravati, where the suspect was arrested and all stolen property was recovered.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=swiftactionexcellentpolicing nis:value=SwiftActionExcellentPolicing nis:enabled=true nis:link/>
एक उत्तुंग कलाकार, अजरामर वारसा!

पद्मश्री नाना पाटेकर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील कार्य सदैव स्मरणात राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली!

<nis:link nis:type=tag nis:id=restinpeace nis:value=RestInPeace nis:enabled=true nis:link/>
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील मागील ६ वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीचा गुन्हे शाखा युनिट ०३ ने शोध घेऊन त्यास वडगाव परिसरातून ताब्यात घेतले.

सदर आरोपी वडगाव परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीची खात्री करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=punepoliceupdates nis:value=PunePoliceUpdates nis:enabled=true nis:link/>
आकाशाच्या उंचीवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भारतीय वायुसेनेतील सर्व वायुवीरांना वायुसेना दिनानिमित्त सलाम! 

<nis:link nis:type=tag nis:id=भारतीय_वायुसेना_दिन nis:value=भारतीय_वायुसेना_दिन nis:enabled=true nis:link/>