
जागतिक हृदय दिनानिमित्त गोल्डन गेट पब्लिक स्कूलची स्पंदन हॉस्पिटलला शैक्षणिक भेट
उदगीर, दि. २९:मातृभूमी विद्या संकुल संचलित गोल्डन गेट पब्लिक स्कूल, उदगीरच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त दि. २९ सप्टेंबर रोजी स्पंदन हॉस्पिटल, उदगीर येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. सुनील माने, डॉ. प्रिया माने, डॉ. सोनाळे, डॉ. देलमटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांचे सकारात्मक पद्धतीने स्वागत केले. शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांना जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. सुनील माने यांनी विद्यार्थ्यांना हृदयाची काळजी कशी घ्यावी, रोज व्यायामाचे महत्त्व आणि जंक फूडचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच हृदयावरील उपचार पद्धती आणि वैद्यकीय उपकरणांची प्रत्यक्ष माहिती दिली. डॉ. प्रिया माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी रुग्णांना गुलाबाची फुले देऊन त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तसेच नर्स आणि वॉर्ड बॉय यांनाही गुलाब देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्दी ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली होती.
हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष सतिश उस्तुरे व संचालिका उषा कुलकर्णी-उस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्राचार्या दीपिका बिरादार तसेच एडमिन स्वाती भांगे यांनी नियोजन केले, तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
Latur, Latur | Sep 30, 2026