
हावगीस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात साजरा
उदगीर : श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथे दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. जी. एमेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे, कार्यक्रमाधिकारी प्रा. मनोहर भालके आणि कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. बी. कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भालके यांनी NSS च्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी अंगी सेवाभाव असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे सांगत स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. एन. जी. एमेकर म्हणाले की, NSS च्या माध्यमातून समाजाशी थेट संवाद साधणे व समाजहिताचे कार्य करणे सहज शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एल. के. उलगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ओ. एस. स्वामी यांनी केले.
या प्रसंगी प्रा. जे. डी. संपाळे, प्रा. कोमल घुगे यांच्यासह NSS चे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latur, Latur | Sep 26, 2026