
अवघ्या तासाभरात चोरीचा 1.93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
लातूर: शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात सुमारे 1 लाख 93 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 453/2026, भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाच नंबर चौक परिसरातील अर्बन बँकेसमोरील रस्त्यावर एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिची ओळख यमुनाबाई नामदेव काळे (वय 78), रा. गोपाळवाडी, कसबे तडवळे, जि. धाराशिव अशी झाली.
तिच्याकडून पंचांसमक्ष 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, चांदीच्या पायातील तीन जोड चैन, VIVO कंपनीचा मोबाईल, 4 हजार रुपये रोख असा एकूण 1,93,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ फुलारी, निजाम शेख, प्रशांत ओगले, पोअं/394 अंकुलगे, शिंदे व माने यांच्या पथकाने केली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
Latur, Latur | Sep 25, 2026