मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील जे.के. फाईल, एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका संशयित व्यक्तीची चौकशी केली असता, सदर व्यक्तीकडे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. सदर इसमाच्या ताब्यातील गांजा व दुचाकी वाहन असा एकूण ₹64,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #SayNoToDrugs #ratnagiri #RatnagiriPolice