
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहरशेठ शहा-वाघोलीकर यांचे निधन
सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले
बारामती : बारामती दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ श्रावक आणि आधारस्तंभ, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष जवाहरशेठ शहा-वाघोलीकर यांचे मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२६) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
जवाहरशेठ शहा-वाघोलीकर यांनी विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करताना सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिले. बारामती दिगंबर जैन समाजामध्ये त्यांना ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आधारस्तंभ म्हणून मानाचे स्थान होते. तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, बारामती नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष आणि बारामती मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि व्यापारी क्षेत्रांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने बारामतीतील विविध क्षेत्रांतून दुःख व्यक्त केले जात आहे.
अंत्ययात्रा : 'धवलगिरी', सिनेमा रोड, बारामती येथून मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्यावर चांदशावली दर्ग्याजवळील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवाहरशेठ शहा-वाघोलीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
#RIP #baramatikar #tccollage #jawaharsheth #SadDemise
Baramati, Pune | Nov 7, 2026