
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचा देशात तृतीय क्रमांक💐
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला आणि मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिक पोलीसिंगच्या व्हिजनला अनुसरून, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या AI आधारित ‘RAIDS’ॲपला प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीस तपास प्रक्रियेत प्रभावी वापर करणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मनःपूर्वक अभिनंदन..
Narendra Modi CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #pmo #silvercup #competition #3rd #ratnagiripolice