चाकूहल्ल्याच्या घटनेतील जखमी व्यक्तीस तत्परतेने मदत करून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याबद्दल पोलीस अंमलदार यशवंत देवीसिंग पवार (बक्कल क्र. 7081), अंबाझरी पोलीस स्टेशन यांचा मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, सुट्टीवर व कुटुंबासोबत असतानाही त्यांनी दाखविलेल्या धाडस व कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना ₹10,000/- चे रोख बक्षीस मंजूर करण्यात आले.