Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

अमरावतीत मोठी कारवाई 277 ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद, ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त दि. 01/08/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोली रोड, साई हेरिटेज परिसरात सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष), रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती याला एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थाची विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपीकडून 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, गुन्ह्यात वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी तसेच 2 आयफोन असा एकूण ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी : 👤 साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष) रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती जप्त मुद्देमाल : 💊 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज – ₹41,55,000/- 🚗 फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी – ₹10,00,000/- 📱 2 आयफोन – ₹1,70,000/- 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹53,25,000/- आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. #AmravatiCItyPolice #CrimeNews #CrimeControl

Amravati, Maharashtra | Aug 2, 2026

MORE NEWS

अमरावतीत मोठी कारवाई 277 ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद, ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त दि. 01/08/2026 रोजी राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अकोली रोड, साई हेरिटेज परिसरात सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष), रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती याला एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थाची विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपीकडून 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, गुन्ह्यात वापरण्यात आलेली फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी तसेच 2 आयफोन असा एकूण ₹53.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी : 👤 साहिल राजेश मेहरा (वय 22 वर्ष) रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती जप्त मुद्देमाल : 💊 277 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज – ₹41,55,000/- 🚗 फोर्ड इकोस्पोर्ट चारचाकी – ₹10,00,000/- 📱 2 आयफोन – ₹1,70,000/- 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹53,25,000/- आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये राजापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. #AmravatiCItyPolice #CrimeNews #CrimeControl - Amravati News