
मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत अखेर दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना या १० मोठ्या सवलती मिळणार
छत्रपती संभाजीनगर, दि. २६ सप्टेंबर: खरीप २०२६ मधील पर्जन्यतूट आणि पिकांच्या नुकसानीमुळे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील ८ जिल्ह्यांतील ७४ तालुक्यांमध्ये दुष्काळ (Trigger-1) जाहीर करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी केला असून राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये या सवलती लागू असतील.
जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुके:
१. छत्रपती संभाजीनगर (९): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
२. जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
३. बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
४. लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
५. धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा
६. नांदेड (१४): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
७. परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
८. हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या १० मोठ्या सवलती:
१. जमीन महसुलात सूट
२. पीक कर्जाचे पुनर्गठन
३. शेती कर्ज वसुलीला स्थगिती
४. कृषी पंपांच्या वीजबिलात सूट (७.५ HP पर्यंत आधीच माफ, त्यावरील क्षमतेसही सूट)
५. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
६. कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे
७. टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
८. रोहयो (MGNREGA) कामांच्या निकषात शिथिलता
९. जनावरांसाठी चारा उपलब्धता
१०. शेतमजुरांना अन्नधान्य टंचाई भासू न देण्याची व्यवस्था
पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश:
Trigger-1 लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे सुरू करावेत. पिकस्थितीचे फोटो आणि GPS लोकेशनसह अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करावा, असे आदेश आहेत. प्रत्यक्ष नुकसानीची मदत स्वतंत्र GR द्वारे जाहीर होणार आहे.
Latur, Latur | Sep 26, 2026