पत्रकारांच्या हस्ते बुधोड्यात महाराजा गणरायाची आरती; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
बुधोडा (ता. औसा) -औसा तालुक्यातील बुधोडा येथे गणेशोत्सवानिमित्त महाराजा गणेश मंडळाच्या महाराजा गणरायाची आरती अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या राधिका पाटील तसेच पत्रकार मनीष हजारे, आनंद दनके आणि सुनील कांबळे यांच्या शुभहस्ते श्रींची आरती करण्यात आली.
आरतीवेळी 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात आरतीमध्ये सहभाग घेतला.
महाराजा गणेश मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आरतीनंतर मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेत मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
या प्रसंगी महाराजा गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भक्तिमय आरतीमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखीनच भर पडली आहे.
Latur, Latur | Sep 25, 2026