लातूर - अवघ्या तासाभरात १.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गु.र.नं. 453/2026, भा.न्या.सं. 303(2) अन्वये चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या तासाभरात 1 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पाच नंबर चौक, अर्बन बँकेसमोरील रस्त्यावर यमुनाबाई नामदेव काळे (वय 78, रा. गोपाळवाडी, कसबे तडवळे, जि. धाराशिव) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून 27 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, चांदीच्या पायातील तीन जोड चैन, VIVO मोबाईल व 4 हजार रोख असा एकूण 1,93,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ फुलारी, निजाम शेख, प्रशांत ओगले, पोअं/394 अंकुलगे, शिंदे व माने यांच्या पथकाने केली.
Latur, Latur | Sep 24, 2026