अवैध जुगारावर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; ₹1.50 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोटगुल यांनी संयुक्त कारवाई करत अवैधपणे जुगार खेळणाऱ्या 36 आरोपींवर कारवाई केली.
कारवाईदरम्यान 34 आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून, 23 चारचाकी वाहने, 05 दुचाकी वाहने व रोख रकमेसह एकूण ₹1,50,97,100/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध व्यवसाय व जुगाराविरोधात गडचिरोली पोलीस दलाची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
#GadchiroliPolice #CrimeBranch #AntiGamblingAction #Gadchiroli #maharashtrapolice