
हावगीस्वामीच्या कु. क्षितीजा नळगिरे हिला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसरे पारितोषिक
उदगीर, दि. २५ (प्रतिनिधी) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विभाग आणि स्कूल कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत श्री हावगीस्वामी महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. क्षितीजा नळगिरे हिने "पर्यावरण असंतुलन : कारणे व उपाय" या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त करून तिसरे पारितोषिक पटकावले. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.
या स्पर्धेत हावगीस्वामी महाविद्यालयातील वैभवी वारद, सादिया आत्तार, वैष्णवी वेरुळे, महेकफातिमा शेख आणि राधिका बिरादार या विद्यार्थिनींनी देखील सहभाग नोंदविला.
क्षितीजा नळगिरे हिने यश संपादन केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर, सचिव डॉ. मनीषा वडियार, उपाध्यक्ष राजकुमार हरकरे, रवींद्र हसरगुंडे, सहसचिव सुबोध अंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, संस्थेचे सर्व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. जी. एमेकर, उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे, निबंध, वक्तृत्व आणि वादविवाद मंडळाचे प्रमुख डॉ. म. ई. तंगावार, पर्यवेक्षक प्रा. महेश बोळेगावे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.
Latur, Latur | Sep 26, 2026