व्यावसायिकाची ₹५ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर धारदार लोखंडी हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना गोलिवाला भवन, सॅलिसबरी पार्क परिसरात घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना स्वारगेट पोलिसांतर्फे दोघांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींनी मार्केटयार्ड परिसरात एका व्यापाऱ्याची ₹३० लाखांची रोकड असलेली बॅग लुटल्याची कबुली दिली. या दोन्ही प्रकरणांशी संबंधित कारवाईत चारचाकी व दुचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे आणि ₹६.५० लाख रोख रक्कम असा एकूण ₹२४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#PunePoliceUpdates