डोंबिवली स्थानकात महिला टीसीची माणुसकी; प्रसंगावधान राखत जखमी प्रवासी महिलेचा वाचवला जीव!.. घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरताना गर्दीच्या रेट्यात एक महिला फलाटावर पडून गंभीर जखमी झाली.
महिलेवर मागून उतरणारे काही प्रवासीही तिच्यावर पडल्याने तिची प्रकृती अधिक बिघडली आणि ती वेदनेने विव्हळत होती.
त्याच डब्यातून उतरलेल्या महिला तिकीट तपासनीस (टीसी) वृषाली सावंत-जाधव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
सुरुवातीला हमालांना बोलावण्यास सांगितले, मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
जखमी महिलेला उचलून स्टेशन प्रबंधक कार्यालयात नेण्यात आले आणि तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
महिला टीसीच्या तत्परता, धाडस आणि माणुसकीमुळे प्रवासी महिलेचा जीव वाचला असून डोंबिवली स्थानकात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Kalyan, Thane | Aug 6, 2026