Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची धक्कादायक  फसवणूक!  १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने '५' लिहून बनवले  ५१० रुपयांचे तिकीट; भामटा गजाआड कल्याण - कल्याण रेल्वे स्टेशनवर एका तरुण प्रवाशाची चलाखीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने '५' लिहून ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचा बनाव करत तब्बल ५०० रुपये उकळणाऱ्या भामट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वरील तिकीट काउंटरसमोर घडली. सारिकुल मोहम्मद शेख हा हावडा (पश्चिम बंगाल) येथे जाण्यासाठी कल्याण स्टेशनवर आला होता. त्यावेळी अतुल अडलिंगे (वय ३२, रा. सोलापूर) याने त्याचा विश्वास संपादन केला. हावड्याचे तिकीट काढून देतो असे सांगत आरोपीने त्याला फक्त १०  रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट दिले. त्यानंतर त्या तिकिटावर मार्कर पेनने '५' हा अंक लिहून ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचा भास निर्माण केला आणि प्रवाशाकडून ५०० रुपये उकळून फसवणूक केली.फिर्यादीने तत्काळ रेल्वे पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर वरिष्ठ  पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अतुल अडलिंगे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रेल्वे पोलिसांचे आवाहन रेल्वे प्रवाशांनी कोणत्याही अनोळखी किंवा अनधिकृत व्यक्तीकडून रेल्वे तिकीट खरेदी करू नये. तिकीट नेहमी अधिकृत तिकीट काउंटरवरून किंवा UTS मोबाईल ॲपद्वारेच काढावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Kalyan, Thane | Aug 6, 2026

MORE NEWS

खडेगोलवली नव्हे, आता ‘खड्डेगोलवली’ करा!; कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप

कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी उपरोधिक मागणी केली आहे.

या मार्गालगत बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी बस चालकांना तब्बल अर्धा तास आधी निघावे लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खडेगोलवली नव्हे, आता ‘खड्डेगोलवली’ करा!; कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकाजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी उपरोधिक मागणी केली आहे. या मार्गालगत बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये तसेच दाट लोकवस्ती असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचारी आणि नागरिकांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असून चालकांना पाठदुखी, कंबरदुखीसह विविध शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवण्यासाठी बस चालकांना तब्बल अर्धा तास आधी निघावे लागत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत "खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Kalyan, Thane | Aug 7, 2026

लवकरच कल्याण शिळरोड बाबत आंदोलन घेणार यांना फक्त बर्थडे दिसतायेत खड्डे नाही - मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधार्यांना  टोला

लवकरच कल्याण शिळरोड बाबत आंदोलन घेणार यांना फक्त बर्थडे दिसतायेत खड्डे नाही - मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधार्यांना टोला

Kalyan, Thane | Aug 6, 2026