कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची धक्कादायक
फसवणूक!
१० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने '५' लिहून बनवले
५१० रुपयांचे तिकीट; भामटा गजाआड
कल्याण -
कल्याण रेल्वे स्टेशनवर एका तरुण प्रवाशाची चलाखीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावर मार्करने '५' लिहून ते ५१० रुपयांचे तिकीट असल्याचा बनाव करत तब्बल ५०० रुपये उकळणाऱ्या भामट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वरील तिकीट काउंटरसमोर घडली.
सारिकुल मोहम्मद शेख हा हावडा (पश्चिम बंगाल) येथे जाण्यासाठी कल्याण स्टेशनवर आला होता. त्यावेळी अतुल अडलिंगे (वय ३२, रा. सोलापूर) याने त्याचा विश्वास संपादन केला. हावड्याचे तिकीट काढून देतो असे सांगत आरोपीने त्याला फक्त १०
रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट
Kalyan, Thane | Aug 6, 2026