आरटीई संदर्भातील प्रशासनाचा नवं फरमान मान्य नाही,
इंग्रजी शाळांचा नेतृत्व करणारी मेस्टा संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राईट टू एज्युकेशन ॲक्ट अर्थात आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकं देण्याचा नवा आदेश शाळांना जाहीर केला आहे, या आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीस असोसिएशन म्हणजे मेस्टा ही संघटना आक्रमक झाली आहे, प्रशासनाने हा फरमान तात्काळ रद्द करण्याची मागणी मेस्टाकडून करण्यात आली, त्याचबरोबर इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा तसेच आरटीई मार्फत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्क 3000 कोटी रुपये सरकारकडे थकबाकी असल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयराव तायडे पाटील, यांनी दिली ती थकबाकी सरकारने त्वरित शाळांच्या खात्यात जमा करण्याची मागणी ही करण्यात आली
Kalyan, Thane | Aug 6, 2026