ठाणे पोलिस आयुक्तालय, डीसीपी झोन-५, वर्तकनगर पोलिस स्टेशन आणि इगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यूथ कनेक्ट’ उपक्रमांतर्गत ‘Say No to Drugs, Yes to Life’ या विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
विवियाना मॉल येथे आर. जे. ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘अभिनय कट्टा’ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Say No to Drugs, Yes to Life’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून युवकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि निरोगी, सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमास एसीपी ममता डिसूझा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण माने, पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल चौगुले तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. इगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिवळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
विवियाना मॉलमधील असंख्य मान्यवर आणि नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
#youthconnect #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #nashamuktbharat #drugfreeyouth #YouthForChange #नशामुक्तभारत
21 views | Thane, Maharashtra | Sep 9, 2026