रामटेक: देवलापार अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही धरणा जनआंदोलन सुरूच
Ramtek, Nagpur | Mar 14, 2026 वाघांच्या हल्ल्यापासून कायमची सुरक्षा मिळावी या मुख्य मागणीसाठी मागील 12 मार्चपासून सुरु धरना जनआंदोलन शुक्रवार दि. 14 मार्चला 3ऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाच्या ठिकाणी क्षेत्रातील आजी-माजी लोकप्रतिनिधी सहित परिसरातील शेतकरी शेतमजूर पशुपालक उपस्थित आहेत. देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीद्वारे हे आंदोलन सुरू आहे. वाघाच्या दहशतीपासून सर्वांना मुक्त करावे शासनाने स्थायी परिणामकारक कारवाई करावी व वाघांच्या हल्ल्याची समस्या कायमस्वरूपी दूर करून नागरिकांना मुक्त करावे अशी मागणी आहे.