जाफराबाद: बाजार समितीत मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार,संचालक गणेश चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मत
आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश चव्हाण यांनी जाफराबाद शहरातील व तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना पाठिंबा देत मत व्यक्त केले आहे की मागील काही दिवसापासून बाजार समितीत मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी समोर आले आहे या ठिकाणी व्यापारी शेतकऱ्यांना त्रास देत आहे,त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.