मोशी दुर्घटने प्रकरणी - पर्यावरणाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांचे निलंबन
मोशी कचरा डेपोत घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. कर्तव्यात निष्काळजीपणा, शासकीय कामात हलगर्जीपणा, अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामास अभय दिल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आले आहे.
#pimprichinchwad #pcmc #moshi #मोशी #suspended
Haveli, Pune | Jul 15, 2026